मशरूम विक्री करताना कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवे? | Mushroom Learning Center Kolhapur

१.उत्पादन कसे आहे? किवा आपले मशरूम गुणवत्तेनुसार कोणत्या श्रेणीत बसतात?
आपले मशरूम विकताना आपल्या उत्पादनाची गुणवत्तेनुसार मांडणी करावी. काही लोकांना मोठे किवा छोटे मशरूम आवडतात त्यापद्धतीने त्यांना मश्रूम उपलब्ध करून द्या.

२.किंमत 
आपल्या मशरूमची किंमत ठरवताना सर्वसामान्यांना परवडेल असे ठरवावेत. बऱ्याचदा शेतकरी जास्त दर लावतात त्यामुळे ग्राहक आकर्षित केला जात नाही. मग ते मश्रूम विकले जात नाहीत.



३.विक्रीची जागा
विक्रीची जागा खूप महत्त्वाची असते. जागेनुसार ग्राहक येतात. जास्त गर्दी असणाऱ्या ठिकाणी किवा मग जिथे उच्चभ्रू व सुशिक्षित लोकांच्या घराजवळ किंवा बाजारामध्ये मशरूम विकणे फायदेशीर ठरू शकते.


४.जाहिरात करने
आपल्या मालाची जाहिरात करायला विसरू नका. त्याचप्रमाणे मशरूम का खावेत याचे पूर्ण माहितीपत्र लोकांना द्या.

मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933